बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त आणि 23 निवडणूक अधिकारी यांची बैठक पडली पार!

Spread the love

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ साठी गुरूवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या अनुषंगाने महानगरपालिका उप आयुक्त६, सहायक आयुक्ता आणि २३ निवडणूक निर्णय अधिकारी यांची समन्वतय बैठक अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी आज महानगरपालिका मुख्या लयात आयोजित केली होती.

छायाचित्रांसह अंतिम मतदार यादी तयार आहे. मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. काही ठिकाणी मतदान केंद्रांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या बदलांची माहिती राजकीय पक्ष व उमेदवारांना तत्काळ अवगत करावी, असे निर्देश डॉ. जोशी यांनी दिले.

मतमोजणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, निर्भय व कायद्याच्या चौकटीत पार पाडावी. मतमोजणीदरम्यान सर्व कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करावे. कोणत्याही परिस्थितीत, हेतुपुरस्सर अथवा अनावधानानेही, चूक होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष, विश्वासार्ह व पारदर्शक राहील याची जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर आहे, असेदेखील डॉ. अश्विनी जोशी यांनी स्पशष्टव केले.

माननीय राज्य निवडणूक आयोगाचे संकेतस्थिळ तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका संकेतस्थलळावर उमेदवारांची शपथपत्रे प्रसिद्ध करणे, उमेदवार प्रतिनिधी, इलेक्ट्रॉ निक मतदान यंत्रांची अधिकृत तपासणी व कार्यान्वयन प्रक्रिया (EVM Commissioning), मतमोजणी प्रस्तातव (Counting Proposal), उमेदवार व राजकीय पक्ष बैठक, मतमोजणी प्रक्रिया (Counting Procedure), मतमोजणीसाठी कर्मचारी नेमणूक (Appointment of Counting Staff) आदी प्रमुख विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यावत आली.

या बैठकीस विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) श्री. विजय बालमवार, सहआयुक्तf (करनिर्धारण व संकलन) श्री. विश्वाकस शंकरवार, उप आयुक्तत (सामान्या प्रशासन) श्री. किशोर गांधी, सहायक आयुक्त. (करनिर्धारण व संकलन) श्री. गजानन बेल्लावळे यांच्या्सह परिमंडळ उप आयुक्तर, प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्तश, २३ निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

Maharashtra SEC

BMCElections2026 #mumbai

votemumbaikar #election2026

mybmc

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *