मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तानेच 80 कोटींचा महाघोटाळा रचल्याची धक्कादायक माहिती प्रकाशात आली आहे.

Spread the love

मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तानेच 80 कोटींचा महाघोटाळा रचल्याची धक्कादायक माहिती प्रकाशात आली आहे. पुनर्विकास प्रकल्पात “स्वस्त घरे मिळतील” या आमिषाने वरिष्ठ IPS, सरकारी अधिकारी, न्यायिक अधिकारी, अभिनेता आणि उद्योगपतींनाही गुंतवणुकीला भाग पाडण्यात आलं!

मोठा धक्का – गुंतवणुकीचे प्रमाण
एका IPS अधिकाऱ्याकडून 15.5 किलो सोनं + 1.89 कोटी रोख
दुसऱ्या अधिकाऱ्याकडून 8 कोटी रुपये रोख
एका अभिनेत्याकडून तब्बल 28 कोटी – त्यात 20 कोटी रोख!
न्यायपालिकेतील निवृत्त अधिकारी, DCP, SP, Additional CP, पालिका अधिकारी…
सगळ्यांनीच एकाही कागदपत्राशिवाय रक्कम गुंतवली.

हे सर्व सहाय्यक आयुक्ताच्या शब्दावर विश्वास ठेवून!

तक्रारदार निशीत पटेलचा आरोप
सहाय्यक आयुक्ताने गुंडांकडून अपहरण, मारहाण, गोळीची धमकी, 60 कोटींची खंडणी— इतकंच नव्हे तर गोमांस खाऊ घालण्याचाही प्रयत्न!
मोबाईलमधील पुरावे डिलीट करून बंदुकीच्या धाकात कबुली घेतल्याचा पटेल यांचा दावा.

सहाय्यक आयुक्ताचे प्रतिवाद
“मी नाही, पटेलने 60 लोकांची फसवणूक केली,” असा दावा.
पण… बँक नोंदी, करार दाखवण्यास मात्र कणखर नकार.

सवाल प्रशासनाला :

वरिष्ठ IPS, सरकारी अधिकारी, अभिनेता… कोणतेही कागद न पाहता कोट्यवधी कसे काय गुंतवतात?
पुनर्विकास प्रकल्पाला निधीची गरजच नसताना “निकड” कशी निर्माण झाली?
अपहरण-मारहाणीच्या आरोपांवर तातडीने गुन्हा का नोंदवला गेला नाही?

बीएमसीघोटाळा

भ्रष्टाचार

प्रशासनहादरलं

पुनर्विकासस्कॅम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *