युवकांनो सावधान व्यसने विनाशाकडे नेत आहेत! अशा आशयाची हाक आपला माणूस श्री दिलीप किसनराव आमले यांनी प्रादेशिक वाहन कार्यालया मध्ये नवीन लायसन्स धारकांना देऊन मी कधीच व्यसन करणार नाही अशी एकत्रित शपथ दिली.

Spread the love

नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे नवीन लायसन काढण्यासाठी आलेल्या शिकावु विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहून वाहतुकीचे नियम पाळावे यासाठी योग्य मार्गदर्शन केले

आपला माणूस श्री दिलीप किसनराव आमले यांच्या वतीने व्यसनमुक्त जिवन काळाची गरज हे अभियान गेल्या सतरा अठरा वर्षापासून राबवत असतात

या अभियानामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे जिल्हा आर टी ओ माननीय सौ हेमागिनी पाटील मॅडम,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नवी मुंबई
माननीय श्री दत्तात्रय सागोलकर माननीय गजानन गावंडे साहेब सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सहभाग घेतला.

त्रिमूर्ती व्यसनमुक्ती जनजागृती आयोजित व्यसनमुक्त जीवन काळाची गरज या अभियानांतर्गत आपला माणूस श्री दिलीप किसनराव आमले यांनी नवीन लायसन धारक विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जिवन काळाची गरज का ? याविषयी योग्य मार्गदर्शन आणि संवाद साधताना मी कधीच व्यसन करणार नाही! व्यसन करून वाहन चालवणार नाही! अशी शपथ उपस्थित अधिकारी वर्गासमोर नवीन लायसनधारक विद्यार्थी यांना एकत्रितपणे दिली.

अभियानाला माननीय सौ विशाखा ठाकरे मॅडम माननीय श्री अक्षय जाधव साहेब सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तसेच मा श्री सुनील बोर्डे साहेब यांची उपस्थिती प्रार्थनीय ठरली

मुख्य संपादक सतीश नलावडे
न्यूज 18 जनमत वृत्तवाहिनी
डिजिटल युगाचे डिजिटल बातमीपत्र📡

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *