विकास प्रकल्पांसोबत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे तसेच हक्काचे रक्षण करा प्रशांत ठाकूर पनवेल विधानसभा आमदार यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये प्रकार फळे काही मुद्दे केले अधोरेखित!
विकास प्रकल्पांसोबत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे तसेच हक्काचे रक्षण करा प्रशांत ठाकूर पनवेल विधानसभा आमदार यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये प्रकार फळे काही मुद्दे केले अधोरेखित!
पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये नवी मुंबई पनवेल शहरांतर्गत आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले. तसेच राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणूक, आणि महत्त्वाचे प्रकल्प राबवले जात असताना विधानसभेत ठामपणे भूमिका मांडली की या विकास प्रक्रियेत शेतकरी व प्रकल्पग्रस्तांचे हक्कही अबाधित राहिले पाहिजेत. मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या सकारात्मक प्रयत्नांचे प्रशांत ठाकूर यांनी कौतुक केल.आणि विशेषतः नवी मुंबई विमानतळ, एज्युसिटी, मेडिसिटी, स्पोर्ट्ससिटी, मेट्रो, अटल सेतू, आणि नैना यांसारख्या प्रकल्पांचा आढावा घेतला. मात्र! या प्रकल्पांमुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, त्यांना योग्य मोबदला, कायमस्वरूपी मालकी, स्थानिक रोजगार आणि त्यांच्या जमिनीवरच प्लॉट मिळावा यासाठी ठोस धोरणात्मक पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्टपणे अधोरेखित केले. सिडकोच्या भूमिकेवर टीका करत, त्यांनी लीजहोल्डच्या ऐवजी फ्रीहोल्ड मालकी देण्याची, आणि टीपी स्कीममध्ये पारदर्शकता व न्याय्यता राखण्याची मागणी केली. विकास ही केवळ इमारतींची उभारणी नव्हे, तर त्यामागील माणसांच्या न्याय हक्कांची जपणूकही तितकीच महत्त्वाची आहे, हे प्रभावीपणे प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले.मुख्य संपादक सतीश नलावडेन्युज 18 जनमत वृत्तवाहिनीडिजिटल युगाचे डिजिटल बातमीपत्र📡