कॅटवे संघाचा मानकरी ठरला शिवनेर स्पोर्ट्स क्लब बोडके नगर जुन्नर

Spread the love

कॅट वे चषकाचा मानकरी ठरला , शिवनेर स्पोर्ट्स क्लब बोडकेनगर जुन्न

ओतूर : कॅट वे स्पोर्ट्स क्लबचा दिवंगत खेळाडूंचा स्मरणार्थ कॅट वे चषकाचे आयोजन करण्यात आले होते, अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीचा वातावरणात ही स्पर्धा संपन्न झाली पुणे,अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण सोळा संघानी यात सहभाग घेतला होता,लीग पद्धतीने ही स्पर्धा पाच दिवस खेळविण्यात आली.या स्पर्धेला तालुक्यातील क्रीडाप्रेमिनी व शालेय विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला,या स्पर्धेत अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना प्रथमताच राबविण्यात आल्या.

स्पर्धेचा शेवटचा दिवशी कॅट वे स्पोर्ट्स क्लब यांनी शिवजन्मभूमीतील विवीध खेळातील राष्ट्रीय खेळाडूंची सजवलेल्या गाडीतून संपूर्ण मैदानात मिरवणूक काढून त्यांना मानवंदना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला,यात अंडर 19 संघात निवड झालेला रविराज गायकवाड,आयर्नमॅन डॉ अमोल डुंबरे,राहुल तांबे,राष्ट्रीय पदक विजेता सायकलपटू अमित बोऱ्हाडे,अनुज वाघमारे,अवनी तांबे,काव्या नायकोडी,शरद माळवे,सुधीर साबळे,यांचा समावेश होता.या स्पर्धेदरम्यान उपस्थित प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता,त्याला देखील भरपूर प्रतिसाद मिळाला,

महाअंतिम सामना शिवनेर बोडकेनगर व शिव छत्रपती वॉरियर्स जुन्नर यांच्यात झाला अत्यंत अटीतटीच्या लढतीत शिवनेर बोडकेनगर या संघाने प्रथम क्रमांकाचे पासष्ट हजाराचे बक्षीस व मानाची ट्रॉफी जिंकली, द्वितीय क्रमांक शिव छत्रपती वॉरियर्स जुन्नर, तृतीय क्रमांक विकी स्पोर्ट्स क्लब आळे व चतुर्थ क्रमांक युवा ११ ओतूर यांनी पटकावला, मालिकावीर किताबाचा मानकरी प्रमोद बोडके हा ठरला त्यांना स्पोर्ट्स सायकल बक्षीस देण्यात आली,बेस्ट बॉलर शिवा पाडेकर,बेस्ट फिल्डर जमीर इनामदार, उत्कृष्ट फलंदाज सिद्धू भोर,तर मैदानाचा राजा या पुरस्काराचा मानकरी अभि खंडागळे ठरला, विजेत्यांना स्पोर्ट्स सायकल बक्षीस देण्यात आले.

पारितोषिक वितरण समारभावेळी सरपंच छाया तांबे, उपसरपंच प्रशांत तांबे, मोहित ढमाले, छबूराव तांबे,गणेश डुंबरे, संतोष टिकेकर,बाळकृष्ण कवडे,विशाल तांबे, माधवराव डुंबरे,शोभाताई टिकेकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते,या स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून,गणेशदादा डुंबरे, प्रमोद शिंदे,नेहाताई बाबू भाऊ पाटे,छायाताई तांबे,आशिष शहा,सचिन घोलप, आदित्य संजय डुंबरे,छबूराव तांबे, जनार्दन खामकर,शुभम पानसरे,अतुल कानडे,प्रशांत डुंबरे, जिजाभाऊ हांडे,गोकुळ लोखंडे, यांनी सहकार्य केलं, विक्रम बाबा अवचट यांनी स्पर्धेसाठी निशुल्क मैदान उपलब्ध करून दिले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कॅट वे स्पोर्ट्सचे आजी, माजी सदस्य,गोल्डन ग्रुप,आनंदी सफर, चैतन्य श्वास फाउंडेशन, स्व वैभवदादा विजयराव देशमुख प्रतिष्ठान ओतूर यांनी विशेष परिश्रम घेतले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *