लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्याला शेवटी बसवला घरी…..
ऍड.इम्रान पटेल यांच्या तक्रारीची दखल घेऊन सह निबंधक जोपळे निलंबित..
तुकडे जोड तुकडे बंदी कायद्याचे उल्लंघन, सह निबंधक निलंबीत..
जयंत जोपळे, तत्कालीन सह दुय्यम निबंधक ठाणे क्र. 9 त्यांच्या कालावधीत नोंदणी झालेल्या दस्तांची तपासणी करण्यात आली सदर तपासणीमध्ये तुकडे जोड तुकडे बंदी कायदयाचे उलंघन व शासनाचे महसूलाचे नुकसान झाले असल्याने शासन आदेश क्रमांक मुद्रांक-2025/प्र.क्र.187/मुद्रांक-2/ दि. 11 डिसेंबर 2025 रोजीच्या अन्वये निलंबित करण्यात आलेले आहे
ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील सह निबंधक जयंत जोपळे यांनी शासनाची दिशाभूल करून करोडो रुपयांचा महसूल बुडवले म्हणून ऍड. इम्रान मुसा पटेल यांनी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांना पुराव्यानिशी तक्रार केली होती त्याची दखल घेऊन नोंदणी महानिरीक्षक यांनी जयंत जोपळे यांना शासन सेवेतून निलंबीत केले आहे.
या बाबत हकीकत अशी की, श्रीरामपूर येथील ऍडव्होकेट इम्रान मुसा पटेल यांनी त्यांच्या दिनांक 04/11/2025 च्या लेखी तक्रार अर्जात
म्हटले होते की,
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे यांच्या अधिनस्त कार्यरत जयंत जोपळे,सहनिबंध,कळवा,ठाणे यांनी आपल्या अधिकार व पदाचा दुरुपयोग करून 12 कोटी 24 लाख 60 हजार रुपयांचा चुना शासनास लावला असून सदर कोट्यवधी रुपये बेकायदेशीर व गैर मार्गाने बळकावून आपला आर्थिक फायदा करून घेतला आहे.सदर आर्थिक घोटाळ्याची मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे यांनी चौकशी समिती नेमली असता त्यात जयंत जोपळे हे दोषी आढळले असून असा खुलासा केलेला आहे.तसा चौकशी अहवाल आपल्याकडे मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे यांनी सादर केलेलाच आहे.
तसेच जयंत जोपळे हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे दुय्यम निबंधक असताना त्यांनी दिंडोरी तालुक्यातील गट नंबर -323 कसबेवाडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथील दस्त नोंदणी क्रमांक- 2731, 2732,2733, 2734 या दस्त नोंदणी द्वारे नोंदणी झालेले प्लॉट तुकडे जोड- तुकडे बंदी कायद्याची अवज्ञा करुन परिणामी झुगारून जयंत जोपळे,दुय्यम निबंधक,दिंडोरी, जिल्हा- नाशिक यांनी खरेदी विक्री केलेली आहे.
वरखेडा,तालुका दिंडोरी,जिल्हा नाशिक येथील दस्त क्रमांक 246, 247 याची सुद्धा खरेदी विक्री तुकडे जोड -तुकडे बंदी कायद्याची अवज्ञा करुन झालेली आहे.
दिंडोरी येथे दुय्यम निबंधक असताना तुकडे जोड,तुकडे बंदी कायद्याची अवज्ञा करुन गैर मार्गाने केलेल्या दस्त नोंदणी बाबत विभागीय आयुक्त नाशिक यांनी जिल्हाधिकारी नाशिक यांना आपल्या दिनांक १३/१०/२०२१ रोजीच्या पत्र क्रमांक 221/पं.क्र. 30587/भु.स.02/जा. क्र. 20929 च्या पत्रानुसार चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते.
तसेच नोंदणी उप महानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक नाशिक विभाग यांनी सुद्धा दिनांक 1/12 /2019 च्या पत्र क्रमांक 59-2021/1424/2021 पत्रानुसार तुकडे जोड,तुकडे बंदीचे उल्लंघन झाले ते निदर्शनास आणून दिले होते. तसेच सदर दस्त नोंदणी अहवाल व खुलासा जयंत जोपळे,दुय्यम निबंधक,दिंडोरी यांना सादर करण्याचा आदेश दिले होते.
तसेच जिल्हाधिकारी नाशिक यांनी त्यांच्या दिनांक 28 /10/2019 च्या पत्र क्रमांक. कुका -4/कावी /735/2021च्या पत्रानुसार तहसीलदार दिंडोरी यांना स्पष्ट आदेश दिले होते की सदर दस्त नोंदणी ही तुकडे जोड, तिकडे बंदी कायद्याचे अवज्ञा व उल्लंघन करून झालेले आहेत, त्यामुळे आपण चौकशी करून अहवाल सादर करावे तसेच सदर गैर कारभार व बेकायदेशीर कामांचा ठपका जयंत जोपळे यांच्यावर केलेला आहे.त्यामुळे भ्रष्टाचारी दुय्यम निबंध जयंत जोपळे यांच्या या गंभीर भ्रष्टाचारी कृत्याची गंभीर दखल घेऊन आपण वरिष्ठ या नात्याने शासनाला लुटून खाणाऱ्या या भ्रष्टाचारी बोक्याची चल व अचल संपत्तीचे जाहीर लिलाव करून शासनाच्या पैसा चक्रवाढ व्याजाने वसूल करावा तसेच त्यांच्यावर BNS 2023 च्या सर्व लागू कायद्यानुसार गुन्हे दाखल करून शासन सेवेतून बडतर्फ करावे म्हणून तक्रार दिली होती त्या तक्रारीची दखल घेऊन राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी जयंत जोपळे यांना निलंबीत केल्याचे आदेश दिले आहेत तसेच सह निबंधक हवेली क्रमांक 4 पुणे यांना सुद्धा गंभीर अनियमितता या कारणाने निलंबीत केले आहे.सदर प्रकरणात खरं म्हणजे जयंत जोपळे यांना बडतर्फ करून त्यांची चल व अचल संपत्तीचे जाहीर लिलाल करून वसुली करायला हवी होती. त्या मुळे ऍडव्होकेट इम्रान पटेल हे पुढील कारवाई साठी न्यायालईन लढाई लढणार आहे असे त्यांनी सांगितले.