नवी मुंबई सारख्या सुसंस्कृत शहराला अश्लीलतेचा बुरखा घालणारे जवळजवळ चाळीस बारमालक यांच्यावर वरदहस्त कोणाचा? कित्येक जन सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच ट्विटर हँडल वरून दक्ष नागरिक,पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते नवी मुंबई पोलीस प्रशासनाला जाणीव करून देत असताना भारंबे साहेबांच्या नावलौकिकला कलंक का लागत आहे?एक कर्तव्यदक्ष अधिकारी नवी मुंबईला भेटलेला असताना देखील बारमालक बिनधास्तपणे रात्री उशिरापर्यंत बार चालू ठेवत आहेत. यामध्ये नवी मुंबई पोलिसांचे पोलीस कर्मचारी सामील आहेत की काय हे प्रश्नचिन्ह सर्वसामान्य लोकांच्या पुढे उभे राहत आहे. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे इंडियन करन्सी बारबालांवर न उडवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने पारित केले असताना देखील नवी मुंबई मध्ये चालवल्या जाणाऱ्या बार मालकांकडून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होतानाचे चित्र राजरसपणे दिसते आहे.सुप्रीम कोर्टाने बार चालू ठेवण्याचे जे दिशा निर्देश दिले आहेत त्याच देखील उल्लंघन करून पहाटे उशिरापर्यंत बारमालक आपले बार सुरू ठेवून आपले खिसे गरम करून घेत आहेत.तसेच बारमलकांचा पिकअप पॉईंट म्हणजे या बारबालांचे सौदा करण्याचे ठिकाण! अशा ठिकाणी एक अमाऊंट कन्फर्म करून या बार बालांकडून देहविक्रीचा व्यवसाय देखील खुलेआम चालू ठेवून नवी मुंबईची प्रतिमा बार मालक खराब करत आहेत.या सर्व अनधिकृत बारमालकांवर मिलिंद भारंबे साहेब यांनी कटाक्षाने लक्ष टाकून त्वरित या बार मालकांना दंडीत करून सुप्रीम कोर्टाच्या दिशा निर्देशांचे भान ठेवून व्यवसाय चालू ठेवावा अन्यथा दंडात्मक कारवाई करून सर्वसामान्य जनतेला उपक्रम करावे.मुख्य संपादक सतीश नलावडे न्यूज 18 जनमत वृत्तवाहिनी.डिजिटल मीडियाचे डिजिटल बातमीपत्र नवी मुंबई.